Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. मागील काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
रविवारी (दि.22) रोजी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील इंद्रायणीनगर लोणावळा येथे महिला आरोपी ही आपल्या राहत्या घरातून तिचा कामगार राजू लहू जाधव (रा. इंद्रायणीनगर) याच्या मार्फत ओळखीच्या व्यक्तींना गांजा या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती.
मिळाल्याने बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी पंचांसमक्ष पथकाने छापा टाकला असता, तिथे 2 किलो 168 ग्रॅम गांजासह रोख रक्कम असा एकूण 59 हजार 880 रूपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. यातील व्यक्तींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल विक्री करीता जवळ बाळगला असल्याचे सांगितले.
सदर कारवाईमध्ये 1) महेमुना सत्तार कुरेशी (वय 54 वर्षे), 2) राजु लहु जाधव (वय 55 वर्षे) दोघेही राहणार इंद्रायणीनगर (लोणावळा ता. मावळ) यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशनला पो. कॉ. सुभाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस व इतर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar
– रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक, वडगाव मावळ वनविभागाची कारवाई । Maval News
– वेहेरगाव तलावात बुडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Karla News