मावळ तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
मावळ तालुक्यातील डोंगरगाव आणि वेताळनगर इथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दोन नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, संपर्कप्रमुख मावळ प्रभाकर पवार, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना मावळ तालुका सल्लागार मारूती खोले, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत डोंगरगाव शाखा आणि वेताळनगर शाखा या दोन्ही ठिकाणचे उद्घाटन संपन्न झाले. ( two new branches of Shiv Sena UBT party were inaugurated in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी बोरज ग्रामपंचायत सदस्य संतोष केदारी आणि सहकारी व डोंगरगाव वेताळनगर येथील युवकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच डोंगरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुनील येवले यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन सचिनभाऊ आहिर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका संघटक अशोक निकम, उपतालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, नगरसेवक शिवदास पिल्लै, सरपंच सुनिल येवले, दत्ताभाऊ भेगडे, शंकर भेगडे, विभाग प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख कृष्णा शिळवणे, उपविभाग प्रमुख शिवाजी गाडे, उपसरपंच स्मिता सुभाष खोले, विभाग प्रमुख भगवान देशमुख, संजय शिंदे, संघटक सुभाष डेनकर उपस्थित होते.
शिवसेना डोंगरगाव शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन पंकज खोले, सुभाष खोले व डोंगरगाव येथील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी केले.
अधिक वाचा –
– बकरी ईदला जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, आरटीओकडून अनेक निर्बंध
– ह्याला म्हणतात स्वागत..!! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांची बैलगाडीतून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक