car accident on old Mumbai Pune highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (दि. 28) रात्री भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातात एका चिमुकल्यासह दोघांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे, रा.मळवली ता. मावळ) यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस (Lonavala Gramin Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून कार चालक प्रविण नागू लोहार (वय 34 वर्षे रा. पवळे ता. मावळ, सध्या रा. मळवली ता. मावळ) याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वी 304 (A) 279, 337, 338 आणि मो. वा. का. क. 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी (दि. 28 एप्रिल) रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास मौजे टाकवे खु. (ता.मावळ) गावचे हद्दीमध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. अपघातात बबन राघु सुतार (वय 50 वर्षे, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) आणि आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10 वर्षे, रा. जाधववाडी नवलाख उंबरे ता.मावळ) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, मयुर ज्ञानेश्वर पंडीत (वय 26 वर्षे, रा.मळवली ता. मावळ), प्रविण नागू लोहार (वय 34 वर्षे रा. पवळे ता. मावळ, हल्ली रा. मळवली ता. मावळ) आणि रक्तेश बाबासाहेब सोनवणे (वय 21 वर्षे रा. भाजे ता. मावळ) हे तिघे जखमी झाले आहेत. ( Two people died in car accident on old Mumbai Pune highway in limits of Takve BK village )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री 12च्या सुमारास मौजे टाकवे गावच्या हद्दीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका कॉर्नरवर आरोपी वाहनचालक प्रविण नागू लोहार याने त्याचे ताब्यातील i20 कार (क्रं. MH.14 FS. 6578) ही कार्ला फाटा येथून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगामध्ये चालवली. यात टाकवे गावच्या हद्दीत महामार्गावर कॉर्नरला अतिवेगामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला खाली खड्ड्यामध्ये पडली. त्यामध्ये तीन जण जखमी झाले. तर बबन राघु सुतार (वय 50 वर्षे) आणि आर्यन ज्ञानेश्वर भालेकर (वय 10 वर्षे) यांचा मृत्यू झाला. असे फिर्यादीत नमुद आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सब इन्सेक्टर भारत भोसले (PSI) हे करत आहेत.
अधिक वाचा –
– श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने 50 लाख मोगऱ्यांचा पुष्पनैवेद्य – पाहा सुंदर फोटो
– वडगाव शहरात महाविकासआघाडीने पेटवली संजोग वाघेरे यांच्या प्रचाराची ‘मशाल’ । Vadgaon Maval
– “…आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील” – संजय राऊत । Maval Lok Sabha