Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दुचाकी चालविण्यास बंदी असताना देखील एका दुचाकी चालकाने एक्सप्रेस वेवर दुचाकी चालविली. यावेळी दुचाकी व कारचा अपघात झाला, ज्यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.29) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उर्से येथे घडला.
- रोहिदास कृष्णा तुपे (वय 50, रा. पवनानगर, मावळ) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी नंदू दामू पाचोने (वय 50, रा. सदाशिव पेठ, पुणे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जखमी दुचाकी चालका विरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दुचाकी वाहन चालविण्यास बंदी आहे. असे असतानाही रोहिदास तुपे याने एक्सप्रेस वेवर दुचाकी चालविली. दरम्यान रोहिदास हे एक्सप्रेस वेवर लेन बदलत असताना फिर्यादी यांच्या कारची दुचाकीला धडक बसली. अपघातात रोहिदास जखमी झाले आहेत. शिरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade