Dainik Maval News : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक शिवदास पिल्ले यांसह लोणावळा उपशहरप्रमुख नरेश काळवीट यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात ( एकनाथ शिंदे यांच्या ) जाहीर प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवासेनेचे विशाल हुलावळे,दत्ता केदारी,नवनाथ हरपुडे उपस्थित होते. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्ज भरण्याच्या दुसऱ्याच दिवशी खासदार बारणे यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पक्षात येत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच मूळ शिवसेना आहे. त्यामुळे राज्यभरातील ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
शिवसेना लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक ताकदीने लढविणार आहे. लवकरच उमेदवारांबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तळेगाव दाभाडे शहरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपसोबत लढविण्यात येणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायत निवडणूक : नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – सहा. निवडणूक निर्णय अधिकारी
– रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन – कुठे अर्ज करावा, कोणती कागदपत्रे हवी? वाचा सविस्तर
– ठरलं तर ! वडगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार ; १७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार
