मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा बुधवारी (दि. 8 मे) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचारात उतरणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही संजोग वाघेरे यांच्या साठी सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. मावळ लोकसभेसाठी हे दोन नेते प्रचाराची तोफ डागणार आहेत. ( Uddhav Thackeray Sharad Pawar Rally at Sangvi to campaign for Maval Lok Sabha candidate Sanjog Waghere )
बुधवारी सायंकाळी सहा वाजता सांगवी येथे मविआच्या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतील, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी. पी. आय. (एम),आर. पी. आय. (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया आदी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे नेतेही महासभेला उपस्थित राहून त्यांचे विचार मांडणार आहेत.
अधिक वाचा –
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime
– “ना मावळातून ना चिंचवडमधून, श्रीरंग बारणेंना लीड मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून”, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, वाचा सविस्तर