कामशेत ( Kamshet ) पोलिसांनंतर आता लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही ( Lonavla Gramin Police ) ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अनेक अवैध दारूधंद्यांवर छापासत्र सुरु केले आहे. आधी वेहेरगाव आणि त्यानंतर डोंगरगाव येथील गावठी दारू निर्मित करणाऱ्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यात तब्बल 80 हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. ( Under Guidance and Direction of Satya Sai Karthik Lonavla Rural Police Raid on illegal liquor business )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी ( Lonavala Police Sub Divisional Officer ) म्हणून आयपीएस अधिकारी सत्य साई कार्तिक ( Satya Sai Karthik ) यांची नव्यानेच नियुक्ती करण्यात आलीये. नियुक्तीनंतर सत्य साई कार्तिक यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत विभागातील सर्व अवैध धंद्यांना चाप लावणार असल्याचा निश्चय बोलून दाखवला होता. त्यानंतर आता पोलिसांचे तालुक्यातील अनेक ठिकाणी छापे पडताना दिसत आहे. ( Police Raid On Illegal Liquor Business )
लोणावळा विभागासह मावळ तालुक्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास त्यांनी थेट कार्तिक यांच्याशी किंवा परिसरातील पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डोंगरगाव येथील कंजारभट वस्तीजवळ झाडाझुडपात सूर्यदेव राठोड (रा. डोंगरगाव, ता. मावळ) हा आरोपी गावठी हातभट्टीची दारू बनवत असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार हे तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 1 जागीच ठार, 2 गंभीर
– Video : वडगाव मावळमध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद