देशभरात 47 ठिकाणी आज मंगळवारी (दि. 13) रोजगार मेळावे संपन्न झाले. ‘राष्ट्रीय रोजगार मेळावा’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकर भरती करण्यात आलेल्या 1 लाखाहून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरमध्ये मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मावळ तालुक्याचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. (Union Minister Narayan Rane Gave appointment letters to newly appointed employees at Talegaon Dabhade)
भारत आत्मनिर्भर आणि महासत्ता होण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरीकाने योगदान द्यावे, असे आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केले. ‘आत्मनिर्भर भारताचा दृष्टिकोन साकार करण्यासाठी रोजगार निर्मिती महत्वाची आहे. त्यादृष्टीने आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकार रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देत राष्ट्रीय स्तरावर सातत्याने रोजगार मेळावे आयोजित करत आहे. रोजगार मेळावा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एक पाऊल आहे,’ असे त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग
– सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमाला उत्साहात संपन्न । Talegaon Dabhade
– मोठी बातमी! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे 6 गावांमध्ये छापे; 995 लीटर गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News