रायगड : लायन्स क्लब ऑफ खोपोलीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ केला. लायन्स क्लब खोपोलीच्या वतीने प.पू. गगनगिरी आश्रम येथे किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गरीब व गरजू रुग्णासाठी डायलिसिस सेंटर चालवले जाते. त्या ठिकाणी दत्तात्रेय मसुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्याच्या प्रथेला बगल देऊन एक डायलिसिस सायकलसाठी रूपये 1000 ची देणगी देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला. ( unique activity by lions club on occasion of dattatreya masurkar birthday former mayor of khopoli city Raigad )
दत्तात्रेय मसुरकर यांनी डायलिसिस सायकलसाठी केलेल्या मदतीच्या योगदानाचे बदल्यात त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या अभिनव संकल्पनेतून भविष्यकाळात गरीब व गरजू रुग्णांना लाभ होईल, असा मनोदय व्यक्त व्यक्त करताना लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने अध्यक्ष अतीक खोत यांनी आवाहन केले आहे की, ज्या कोणास वाढदिवसा निमित्त अथवा कोणत्याही प्रसंगी शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी लायन्स क्लबच्या या उपक्रमात सामील होऊन डायलिसिस रुग्णांना मदत करावी. या उपक्रमाचा शुभारंभ करताना अध्यक्ष लायन अतीक खोत, सचिव दिपाली टेलर, खजिनदार निजामुद्दीन जळगावकर , लायन सभासद दिलीप पोरवाल, सचीन बोराना यांच्या हस्ते दत्तात्रेय मसुरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– खोपोली शहरात प्रथमच पाळीव मांजरांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी शिबिर, शरीरात बसवली मायक्रोचीप
– खोपोलीतील सुमित डे रायगड जिल्ह्यात वाणिज्य विभागात पहिला, कौतुकाचा होतोय वर्षाव
– खोपोली नगरपरिषदेचा स्वच्छोस्तव 2023 उत्साहात संपन्न, शेकडो महिलांनी घेतला सहभाग