मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ( Mumbai Pune Expressway ) किलोमीटर 34.500 च्या दरम्यान पुणे लेनवर एका अनोळखी व्यक्तीला मृतदेह ( Unknown Dead Body ) शनिवार (3 डिसेंबर) रोजी आढळून आला. सदर अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती व्यक्ती मिडियम गार्डनमध्ये पडलेली होती. अंधारात ती दिसून येत नव्हती. मात्र, एका वाहन चालकाला ती व्यक्ती दिसली आणि त्याने त्याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर त्या व्यक्तीला तेथून उचलून सुरक्षित स्थळी आणून लोकमान्य आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी केली असता ती मृत असल्याचे समजले. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य यावेळी मदतकार्य करत होते. ( Unknown Dead Body Was Found Near Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर व्यक्तीचे शव पुढील कार्यवाहीसाठी खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये आणले. त्यानंतर खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने त्यांच्या मार्फत पुढील तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक स्वरूपात तपासणी केली असता सदर व्यक्तीकडे कोणतीही ओळख पटण्यालायक कागदपत्रे अथवा पुरावा नव्हता. तसेच रविवार रात्रीपर्यंत सदर मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. तसेच, कुणी ओळख दाखवणारे येईल अशी अपेक्षा होती.
मात्र, रविवार (4 डिसेंबर) रात्री उशीरापर्यंत सदर व्यक्तीबाबत कोणत्याही नातेवाईकांनी अथवा व्यक्तींनी संपर्क न केल्याने अखेर त्यावर सोमवारी (5 डिसेंबर) रोजी नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. या व्यक्तीच्या अंत्यविधीचा खर्च खोपोली पोलिस आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था मिळून करणार असल्याची माहिती गुरुनाथ साठेलकर यांनी दिली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पेन येथील विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीत अपघात, लोहगडवरून परतताना बस दरीत कोसळली
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, नियंत्रण सुटल्याने मालवाहू टेम्पो दरीत कोसळला