Dainik Maval News : पायी रस्ता ओलांडणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकण-तळेगाव महामार्गावरील तळेगाव दाभाडे येथील भाजी मंडईसमोर बुधवारी (दि.२५) रात्री घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे अंमलदार कृष्णा बाबळे यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरून टेम्पोचालक अब्दुल कादीर सरदार पटेल (वय ५८, लोटस काॅलनी, गोवंडी, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकासह टेम्पो ताब्यात घेतला आहे. दरम्यान याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा देखील अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे सुरक्षित रस्ते वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
