बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा परिणाम काही राज्यांमध्ये दिसू शकतो, असा इशारा अगोदरच देण्यात आला होता. तसेच महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबर दरम्यान पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. ( Unseasonal Rain In Vadgaon Maval Due To Mandos Cyclone )
त्यानुसार दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रविवारी (11 डिसेंबर) सायंकाळी वडगाव मावळ परिसरात अचानक पावसाची एन्ट्री झाली. साधारण अर्धा तास झालेल्या या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. आधीच ओल्या दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता या अवकाळी पावसामुळे अजून चिंतीत झाला आहे.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, सर्व तालुक्यांमधून नावनोंदणी करण्याचे आवाहन
– वडगाव मावळ । खंडणी आणि दरोडा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर