महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने दिलेल्या सुचनेनुसार वडगाव शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दिनांक 14 एप्रिल 2-23) रोजी शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री शंकर भोंडवे यांच्या निवासस्थानी ‘समरसता स्नेहभोजनाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांमध्ये शहरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, अंगणवाडी मदतनीस आणि कायदेतज्ज्ञ महिलांचा समावेश होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चर्चेदरम्यान मोदी सरकारद्वारे महिलांसाठी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. योजना राबविताना देण्यात येणारे लाभ व प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा झाली. अंगणवाडी सेविकांनी व आशा वर्कर्सनी समस्या मांडताना अंगणवाडी व आरोग्य सुविधांबाबत ज्या गोष्टींची शहरात गरज आहे, त्याविषयी आपापली मते व्यक्त केली. कायदेतज्ज्ञ ॲड. शकुंतला वाडेकर यांनी महिलांविषयक बदललेल्या व नवीन कायद्यांची माहिती दिली.
सामुहिक चर्चेनंतर उपस्थित महिलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मनिषा ढोरे, मीना ढोरे, मंगल जाधव, सोनाली पांडागळे, सुजाता चांदेकर, भाग्यश्री टपाले, उज्वला ठोंबरे या आशा वर्कर्स सह शकुंतला नागे व निलम दिवाडकर आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. वडगाव मावळ भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे आणि मावळ तालुका भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस वैशाली ढोरे यांनी समूहचर्चेचे संयोजन केले. ( vadgaon bjp mahila aghadi organized samarasata bhojan on occasion of dr babasaheb ambedkar birth anniversary )
अधिक वाचा –
– मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमाला उदंड प्रतिसाद । Vadgaon Maval
– दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार