(वडगाव मावळ) मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेले आणि वडगाव नगरीचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त दिनांक 6 आणि 7 एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर आणि उत्सव समितीचे अध्यक्ष संजय दंडेल यांनी याबाबत दिली. ( Vadgaon City Gramdaivat Shri Potoba Maharaj Utsav 2023 Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उत्सवानिमित्त गुरुवारी (दिनांक 6 एप्रिल) पहाटे चार वाजता श्री पोटोबा महाराजांचा अभिषेक, सकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, स. (छबिना), दुपारी चार वाजता मानाच्या काठ्या, 5 वाजता मानाचे बगाड, रात्री 8 वा शोभेचे दारूकाम, रात्री 9 वा भजन स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्या प्रथम पाच क्रमांकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट गायक, वादक व हार्मोनिअम वादक यांना वैयक्तिक पारितोषिके व प्रत्येक सहभागी संघास दोन हजार रुपये व सन्मान चिन्ह दिली जाणार आहेत.
मनोरंजनाच्या कार्यक्रमात रात्री 8 वाजता अभिनेत्री संजना काळे वल सहकाऱ्यांचा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (दिनांक 7 एप्रिल) सकाळी पालखी ज्ञान अमृत वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील बाल भजनी मंडळाच्या सहभागाने पालखी मिरवणूक, दुपारी 4 वाजता डी.एड. कॉलेजच्या मैदानावर कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात रात्री आठ वाजता बॉलिवूड नाईट हा गाणी व नृत्याचा कार्यक्रम होईल.
अधिक वाचा – मावळवासियांसाठी आनंदवार्ता : वडगाव शहरात पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्र सुरू
देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, किरण भिलारे, अरुण चव्हाण, अशोक ढमाले, तुकाराम काटे, सुनिता कुडे, मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष संजय दंडेल, कार्याध्यक्ष सचिन कराळे, शिवाजी येळवंडे, कार्यक्रम प्रमुख बाळासाहेब तुमकर, अनिकेत भगत, अक्षय रौंधळ, संकेत चव्हाण, खंडू जाधव, केदार बवरे, समीर ढोरे, संतोष ढमाले अनिल कोद्रे, सुधीर ढोरे, सोमनाथ धोंगडे, सुहास विनोदे, आदींनी संयोजन केले आहे.
अधिक वाचा –
– वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात
– तळेगावात आठवडे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी; भाजपाचे वाहतूक पोलिस विभागाला निवेदन