व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्तिकी यात्रेनिमित्त मावळ तालुक्यामधून आळंदीकडे प्रवास करणाऱ्या पायी दिंड्यांना पोलिस संरक्षण मिळावे – गुलाबकाका म्हाळसकर

श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 9, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Wari-Warkari

File Photo : Wari Warkari


श्री क्षेत्र आळंदी ( Alandi ) येथे कार्तिकी यात्रेनिमित्त ( Kartiki Ekadashi ) राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. तसेच, यात्रेच्या निमित्ताने कित्येक दिवस अगोदरच वारकरी बांधव पायी दिंडीद्वारे आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. मात्र, अलिकडे पायी दिंडीतील वारकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघातांची वाढती मालिका पाहता आणि तालुक्यात ( Maval Taluka ) गतवर्षी झालेली दुर्घटना पाहता, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर यांनी पोलिसांना विशेष निवेदन दिले आहे. या निवेदनातून त्यांनी पायी दिंड्यांना अचूक वाहतूक नियोजन आणि पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. ( Vadgaon Maval Gulab Mhalaskar Demand For Police Protection To Dindi )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कोकण भागातून येणाऱ्या पायी दिंड्यांना वाहतूक संरक्षण मिळावे – म्हाळसकर

गुलाब काका म्हाळसकर यांनी वडगाव मावळ पोलिस यांना निवेदन पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी, “आळंदी देवाची या ठिकाणी सालाबाद प्रमाणे कार्तिकी एकादशी मोठ्या आनंदात, उत्साहाने साजरी केली जाते. त्यासाठी कार्तिकी एकादशी निमित्त कोकण भागातून अनेक पायी दिंड्या येत असतात. ज्या मावळ तालुक्यातून मार्गक्रमन करत असतात. परंतू मागील वर्षी साते (तालुका मावळ) या ठिकाणी पायी चालणाऱ्या दिंडीमध्ये पिक अप व्हॅन घुसल्याने मोठा अपघात  ( Maval Taluka Dindhi Accident )घडला होता. या अपघातात अनेक वारकरी गंभीर जखमी झाले होते, तर काही वारकऱ्यांना प्राणास मुकावे लागले होते.

तसेच, अलिकडेच कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक कार घुसून भयंकर अपघात झाला होता. सांगोला येथे झालेल्या त्या भीषण अपघातात सात वारकरी मृत पावले होते. या सर्व घडामोडी पाहता, यावर्षी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी यंदा आळंदी कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त कोकण भागातून येणाऱ्या पायी दिंडींना वाहतूक संरक्षण मिळावे”, अशी विनंती गुलाबकाका म्हाळसकर यांनी केली आहे.

हेही वाचा – कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगावमध्ये ज्ञानामृत सोहळा I Vadgaon Maval

त्याचप्रमाणे, यंदा 20 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे कार्तिकी यात्रा असून त्यासाठी आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचा मावळ तालुक्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातून जाणारा महामार्ग यावरुन प्रवास करणाऱ्या दिंड्यांना योग्य ते वाहतूक नियोजन आणि पोलिस संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे गुलाबकाका म्हाळसकर यांनी म्हटले आहे. ( Vadgaon Maval Gulab Mhalaskar Demand For Police Protection To Dindi )

अधिक वाचा –

– PHOTO : सातारा दौऱ्यावर असताना बाळा भेगडे यांनी घेतली खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट
– थाळीफेक स्पर्धेत मावळ तालुक्यातील सार्थक घोजगेला रौप्य पदक, आमदार शेळकेंनी थोपटली पाठ
– पवनानगरमधील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे यांचे दुःखद निधन, मित्रपरिवार शोकसागरात

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)


Previous Post

PHOTO : सातारा दौऱ्यावर असताना बाळा भेगडे यांनी घेतली खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट

Next Post

मोठी बातमी! राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, थेट जनतेतून सरपंच, वाचा कार्यक्रमपत्रिका

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

मोठी बातमी! राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, थेट जनतेतून सरपंच, वाचा कार्यक्रमपत्रिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.