पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान” राबविण्यात येत आहे. ह्या अभियानांतर्गत मंगळवारी (दि. 26 डिसेंबर) रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या स्टाफसह मौजे टाकवे गावच्या हद्दीत छापा मारला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलिसांनी टाकवे बु. गावाच्या हद्दीतील आरोपी 1) पोपट विठोबा जांभुळकर 2) सोमनाथ पोपट जांभुळकर दोन्ही रा. टाकवे बु (ता. मावळ. जि. पुणे) यांच्या घरावर छापा मारला असता, घटनास्थळी आरोपी यांच्याकडून 1 लाख 8 हजार 640 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक कुमार कदम, मपोउपनि ऋतुजा मोहिते, पोहवा/821 गायकवाड, पोहवा/400 कसेबकर, पोहवा/1008 सुपे, पोहवा/137 होले, पोना/2413 तावरे, ‘पोशि/1099 कुंभार, पोशि/2449 पतुरे, यांनी केली.
गुन्ह्याचा पुढील तपास मपो उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते ह्या करत आहेत. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले कि, यापुढेही “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कारवाई चालू ठेवणार आहोत. ( vadgaon maval police raid adhle budruk village two arrested for illegally storing ganja )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश । Vadgaon Maval
– ‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’, सचिन अहिर यांनी ठणकावून सांगितले, वाचा सविस्तर
– लोणावळ्यात व्यापाऱ्यांवर झालेल्या मारहाणप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा