वाहन म्हणजे लक्ष्मी अशी संकल्पना आपल्याकडे आहे. त्यामुळे वाहनाची चोरी झाल्यानंतर घरातील लक्ष्मी गेल्याचे दुःख होत असतं. अशात तेच वाहन पुन्हा गवसल्यानंतर सोने मिळाल्याचा आनंद संबंधितांना होतो. ( Vadgaon Maval Police Returned 32 Stolen Vehicles To Their Owners )
शनिवारी (दिनांक 22 एप्रिल 2023) अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वडगाव मावळ पोलिस आणि गंगामाता वाहन शोध संस्था परंदवडी यांच्या माध्यमातून 32 वाहनमालकांना त्यांचे चोरी झालेले वाहन सुपूर्द करण्यात आले. सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी लोणावळा विभाग, IPS सत्यसाई कार्तिक यांच्या हस्ते वाहनाचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विलास भोसले, गंगामाता संस्थेचे अध्यक्ष राम उदाकांत पोलिस अधिकारी, पोलिस आणि वाहन मालक उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गंगामाता वाहन शोध संस्था परंदवडी यांच्या माध्यमातून राम उदावंत यांनी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील एकूण 97 वाहनांपैकी 32 वाहन मालकांचा शोध लावण्यात आला. या 32 वाहन मालकांना शनिवारी त्यांची वाहने सुपूर्द करण्यात आली. यात प्रामुख्याने एका चारचाकी वाहनाचाही समावेश होता.
नांदेड, मुंबई, जळगाव, कऱ्हाड, पुणे व अन्य भागातील वाहन मालकांची बेपत्ता वाहने वडगाव पोलिस ठाण्यात पाच वर्षांपासून जमा होती, पण मालकांचा शोध लागत नव्हता. गंगामाता संस्था आणि पोलिसांनी मूळ मालकांचा शोध घेऊन ती परत केली.
अधिक वाचा –
– आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या मुंबईच्या दोन बुकींना लोणावळा परिसरातून अटक
– पुण्यात उबेरसह ‘या’ चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले