टाकवे बुद्रूक औद्योगिक वसाहतीमधील बंद गोडाऊन फोडून त्यातील सुमारे साडेनऊ लाख रुपये किमतीच्या विदेशी बनावटीच्या स्पोर्टस बाईक चोरून नेणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात वडगाव मावळ पोलिसांना यश आले आहे.
हरिदास सीताराम चवरे (वय 30 वर्षे, रा. टाकवे बु. मूळ रा. भटसांगवी ता. जि. हिंगोली), परशुराम दिगंबर सरडे (वय 31, रा. अहिरवडे फाटा, मुळ रा. इंगळकी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), तुफैल अलीम खान (वय 21, रा. अहिरवडे फाटा, मुळ रा. खमहरिया ता. उतरौला, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश), इमरान रिझवान खान (वय 25, रा. अहिरवडे फाटा, मूळ रा. खमहरिया, ता. उतरीला, जि.बलरामपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आरोपींकडून इटली बनावटीच्या बेनेली कंपनीच्या स्पोर्टस बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेला एक महिंद्र कंपनीचा पिकअपही जप्त करण्यात आला आहे. ( vadgaon maval police successfully investigate two wheeler theft accused arrested )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जून 2022 मध्ये चोरट्यांनी टाकवे बुद्रूक येथील औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित उद्योगपतीच्या मालकीचे व युनियन बँकेच्या ताब्यात असलेल्या सिलबंद गोडाऊनचा दरवाजा तोडून आतील विदेशी बनावटीच्या पाच नवीन स्पोर्टस बाईकची चोरी केली होती. याप्रकरणी बँकेचे अधिकारी दीपक कुमार ताराचंद (रा. हडपसर, पुणे) यांनी गेल्या वर्षी (ऑगस्ट 2022) फिर्याद दिली होती.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या गुन्ह्याच्या तपासामध्ये विशेष लक्ष घालून तपास पथक गठित केले होते. अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील जावळे, सचिन गायकवाड, श्रीशैल कंटोळी, संजय सुपे, सचिन काळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
हेही वाचा – ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मावळ तालुक्यातील 3 हजार 68 नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा लाभ
सचिन काळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे लक्षात घेऊन तसेच त्याठिकाणी सुरक्षेची कोणतीही आधुनिक साधने नसल्याचा गैरफायदा घेऊन गुन्हा केल्याचे तपासामध्ये उघड झालेले आहे. त्यामुळे उद्योजकांनी आपल्या गोडावूनच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टम या सारख्या आधुनिक सुरक्षाविषयक साधनांचा अवलंब करावा असे आवाहन पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– आंदर मावळातील खांडी गावात जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त कार्यक्रम; 85 महिला आणि मुलींचा समावेश
– महाराष्ट्र नाभिक महामडंळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी संतोष रसाळ, पाहा नवीन कार्यकारिणी