Dainik Maval News : वाहतुकीचे नियम मोडणारे वाहन चालक आणि वाहनांबाबतचे नियम डावलणारे वाहन चालक यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलिसांनी कडक पाऊल उचलत विशेष मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच वडगाव मावळ पोलिसांनी वडगाव बाजारपेठेत चेकपोस्ट करून ह्या कारवाईच्या मोहीमेची सुरूवात केली होती. त्यानंतर बुधवारी (दि. ४) पुन्हा एकदा धडक कारवाई करण्यात आली.
वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत बुधवारी पोलिसांनी नाकाबंदी करून नाकाबंदी दरम्यान अनेक बेशिस्त वाहन चालक आणि वाहतुकीचे नियम मोडणारे चालक यांच्या विरोधात कारवाई केली. यात ट्रिपल सीट ( 8 ), ब्लॅक फिल्मी ( 5 ), विदाऊट लायसन ( 6 ), सायलेन्सर बदल ( 2 ), फॅन्सी नंबर प्लेट ( 4 ) अशा एकूण २५ वाहनांवर व चालकांवर कारवाई केली.
एकूण कारवाईत तब्बल ६१ हजार ४०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत देशमुख हे आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली. नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले असून पुढेही अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या
– पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी
– कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

