वडगाव मावळ (Vadgaon Maval) शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सव (तिथीप्रमाणे) ( Shiv Jayanti) मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या उत्सवाबाबत बैठक घेण्यात आली, ज्यात संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी यंदाची कार्यकारणी जाहीर केली. शिवजयंती उत्सवाचे हे 45 वे वर्ष आहे. यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : अनंता कुडे, कार्याध्यक्ष : खंडूशेठ भिलारे, कार्यक्रम प्रमुख : अतिश ढोरे व दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष : महेंद्र म्हाळसकर, संतोष भालेराव, अनिल ओव्हाळ, सागर मराठे, खजिनदार : अतुल म्हाळसकर, सहखजिनदार : गणेश भिलारे, गणेश गवारे, सचिव : कुलदीप ढोरे, सहसचिव : समीर गुरव, विकी म्हाळसकर, गणेश वहिले यांची नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी नारायण ढोरे, पंढरीनाथ भिलारे, गुलाबराव म्हाळसकर, किरण भिलारे, सोमनाथ काळे, संभाजी म्हाळसकर, दिनेश ढोरे, दिलीप चव्हाण, दिपक कुडे, गणेश हिंगे, किरण म्हाळसकर, ऍड विजयराव जाधव, प्रसाद पिंगळे, रविंद्र म्हाळसकर, शंकर भोंडवे, दिपक भालेराव, कल्पेश भोंडवे आदीसह शिवजयंती उत्सव समिती अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ( Vadgaon Maval Shiv Jayanti Celebration Committee 2024 )
अधिक वाचा –
– वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी
– लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News