अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका व श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंड्यांना सतरंजी तसेच दिंडीतील निष्ठावंत वारकरी विणेकरी महिला भगिनी यांचा यथोचित सन्मान समारंभ व श्री क्षेत्र पोटोबा महाराज देवस्थान चा वार्षिक तेरावा अहवाल प्रकाशन सोहळा हा कार्यक्रम संपन्न झाला. ( vadgaon maval shree potoba maharaj devasthan annual report presented )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग आप्पा बारणे आपल्या मनोगत मध्ये म्हणाले की, श्री क्षेत्र पोटोबा देवस्थानच्या पारदर्शक कार्याचा आदर्श वारकरी संप्रदायने घेऊन समाज कार्य करत राहावे व आपले जीवन वारकऱ्यांसाठी व्यथित करावे असे मत व्यक्त केले. तसेच भविष्यात वारकरी संप्रदाय व श्री क्षेत्र पोटोबा देवस्थानला विकासकामांसाठी सर्वोतपरी मदत करू असे आश्वासन दिले
याप्रसंगी अखिल भारतीय वारकरीमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले, देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, ह भ प संतोष महाराज काळोखे, देवस्थान चे उपाध्यक्ष गणेशअप्पा ढोरे, भाजपा चे प्रभारी भास्करअप्पा म्हाळसकर, नगराध्यक्ष मयूर ढोरे, जिल्हा अध्यक्ष सुखदेव ठाकर, या सर्वांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली. ह भ प बोधले महाराज यांनी देवस्थान व वारकरी संप्रदाय यांचे संयुक्त कार्याचे कौतुक केले.
मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थान च्या कार्याचा आढावा व भविष्यातील देवस्थान उ्दिष्टे याचा आलेख वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांपुढे आपले मनोगतामधून सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त सचिव अनंता कुडे, स्वागत विश्वस्त सुभाषराव जाधव व दत्तात्रय महाराज शिंदे आणि सूत्रसंचालन नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, तर आभार वारकरी मंडळाचे वडगाव अध्यक्ष नारायण ढोरे यांनी मानले.
वडगाव वि का सोसायटीचे मा चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर यांनी सतरंजी, नगरपंचायत च्या उप नगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी महिला भगिनीं यांना साडीचोळी, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी उपरणे असे वस्तुरूपी साहित्य देण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी,व्यासपीठावर पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सरपंच कुलदीप बोडके,मा सभापती राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, देवस्थान चे विश्वस्त किरण भिलारे, ऍड अशोकराव ढमाले, ऍड तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे, नगरसेवक, गटनेते दिनेश ढोरे, श्रीधर चव्हाण, ह भ प शांताराम बोडके, ह भ प गणेश महाराज जांभळे, दिलीप महाराज खेंगरे,महादूबा सातकर,संतोष कुंभार, सुनील हगवणे,पंढरीनाथ भिलारे आदीजन उपस्थित होते. महाप्रसाद चे नियोजन शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर व नगरसेवक किरण म्हाळसकर यांचे वतीने करण्यात आले.
अधिक वाचा –
– कार्ला लोणावळा येथील पर्यटन विकास प्रकल्पांना शिंदे-फडणवीस सरकारची मंजूरी!!
– मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी