Dainik Maval News : राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. हे नामनिर्देशन अर्ज पत्र निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ विधानसभा मतदारसंघ, यांच्या कार्यालयात अर्थात तहसील कार्यालय, वडगाव मावळ तालुका येथे दाखल करण्यात येणार आहेत.
त्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीमध्ये वडगाव येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या संभाव्य गर्दीचे अनुषंगाने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मावळ यांच्या सूचनेनुसार, वडगाव मावळ शहरातील दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार, आज दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा
– राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! मावळ विधानसभेतून आमदार सुनिल शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी, पाहा संपूर्ण यादी
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे