घाटकोपर मुंबई येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर, अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकृत/अनधिकृत होर्डिंग, उंच लोखंडी मनोरे, उंच लोखंडी ढाचे इत्यादीची नगरपंचायत प्रशासक मुख्याधिकारी मुख्य डॉ. प्रवीण निकम यांनी सहाय्यक नगरचनाकर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात असणारे तसेच, रस्ते विकास महामंडळाच्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत एकूण 12, तळेगाव-उर्से रस्त्याच्या लगत 4, व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या रस्त्याच्या हद्दीत 9 असे एकूण छोटे मोठे पंचवीस होर्डिंग शहरात सध्या अस्तित्वात आहेत. नगरपंचायत मार्फत सर्व होर्डिंग मालकांना नोटीस देऊन सात दिवसाच्या आत नवीन स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल न. प. कार्यालयास सादर करणेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ( Vadgaon Nagar Panchayat Administration Inspected hoardings in city )
तसेच अनधिकृत होर्डिंग धारकांनी विहित नमुन्यात परवानगी घ्यावी, अन्यथा अनधिकृत होर्डिंग तात्काळ काढण्यात यावे व तसेच रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीत असणाऱ्या होर्डिंगधारकांनी सदर कार्यालयाकडून परवानगी घेतली असल्यास त्यांची एक प्रत व संरचनात्मक तपासणी अहवालाची एक प्रत नगरपंचायत कार्यालयात जमा करावी. अन्यथा शहरातील सर्व अनाधिकृत होर्डिंग नगरपंचायत मार्फत काढून टाकण्यात येईल व येणारा खर्च होर्डिंग धारकांकडून वसूल करण्यात येईल.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाही करण्यात येईल, तसेच यापूर्वी नगरपंचायत मार्फत लेखी व तोंडी स्वरूपात शहरातील होर्डिंग धारकांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. मागील वर्षी राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील होर्डिंग्स हटवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोमवारपासून (दि. 20 मे) रस्ते विकास महामंडळ व नगरपंचायत यांच्या मार्फत संयुक्त रित्या शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स काढण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या सूचना नगरपंचायत प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांनी दिल्या आहेत.
अधिक वाचा –
– दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News
– वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब काळे यांचा चिठ्ठीवर विजय !
– तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व होर्डिंग अनधिकृत ? । Talegaon Dabhade