Dainik Maval News : वडगांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मतदान प्रक्रिया दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार मतमोजणी, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित आहे. मतमोजणी ही सकाळी १० वाजलेपासून वडगाव नगरपंचायत सभागृह येथे पार पडणार आहे.
सदर मतमोजणी करिता आवश्यक पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने एकूण सात टेबल लावण्यात येणार आहेत, प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक एक सहाय्यक व शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणी ही एकूण 24 मतदान केंद्राकरिता व 17 प्रभागांकरता करण्यात येणार आहे. मतमोजणी टेबल हे प्रभागाननिहाय असणार आहे व एका टेबलवर त्याच प्रभागाचे मशीन असणार आहेत. एकूण चार फेरी मध्ये मतमोजणी होणार आहे. कोणत्या टेबलवर कोणत्या प्रभागाचे मशीन, कोणत्या मतदान केंद्राचे मशीन असणार आहे याबाबत मतमोजणी कक्षामध्ये फलक लावण्यात आले आहेत.
मतमोजणी करिता सकाळी ९:३० वा स्ट्रॉंग रूम उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार यांच्या समक्ष व्हिडिओ शूटिंग करून उघडण्यात येणार आहे. त्याच्यानंतर सकाळी १०:०० वाजता प्रत्येक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे. सदर मतमोजणी करिता नगराध्यक्ष व सदस्य यांच्या मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वांना याबाबत अवगत करून ओळखपत्र देण्यात आलेले आहेत.
यापूर्वी निवडणूक विभागाकडे ज्या उमेदवार प्रतिनिधींची नावे देण्यात आलेली आहे व त्यांना ओळखपत्र प्राप्त झालेला आहे त्याच उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी कक्षामध्ये ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
नगरपंचायत कार्यालयाच्या तळमजल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी करिता कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची नागरिक उमेदवार उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांनी दक्षता घ्यावी ही विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने उमेदवार व उमेदवार प्रतिनिधी यांचे करिता दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी स. ११:०० वा नगरपंचायत कार्यालय मध्ये बैठक आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी सदर बैठकी करता उपस्थित राहून आवश्यक ती माहिती घ्यावी ही निवडणूक विभाग वडगाव नगरपंचायत यांच्यामार्फत विनंती करण्यात येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

