मावळ तालुक्याचे केंद्र असलेल्या वडगाव शहर नगरपंचायतीमधील लोकनियुक्त नगराध्य़क्ष आणि नगरसेवक यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून नव्या नगरपंचायतच्या स्थापनेसाठी निवडणूक होईपर्यंत सर्व कारभार हा प्रशासकाच्या हाती राहणार आहे. त्यामुळेच वडगाव नगरपंचायतवर आता ‘प्रशासक’राज आले आहे. ( Vadgaon Nagar Panchayat Tenure Ended Praveen Nikam Will Take Charge As Administrator )
वडगाव शहराचा कारभार पूर्वी ग्रामपंचायतकडे होता. परंतू फेब्रुवारी 2018 मध्ये तत्कालीन आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतून ग्रामपंच्यातीचे युती सरकारने नगर पंचायतीत रुपांतर केले. दिनांक 15 जुलै 2018 मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक निर्वाचित झाले. मयूर ढोरे यांना शहराचे प्रथम लोकानियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
वडगाव नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोजी झाली आणि तेव्हापासून नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ सुरू झाला होता. तो मंगळवारी संपुष्ठात आला. पाच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आणि मनसेच्या एका सदस्याला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. तर भाजपच्या अर्चना म्हाळसकर यांना प्रथम तर मनसेच्या सायली म्हाळसकर यांना शेवटच्या टर्ममध्ये उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. पाच वर्षात भाजपच्या सात तर राष्ट्रवादी काँगेसच्या तीन कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळाली.
मंगळवारी (दिनांक 8 ऑगस्ट) रोजी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये आता प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम हे सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे आता निवडणूक होईपर्यंत नगरपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती राहणार आहे. ( Vadgaon Nagar Panchayat Tenure Ended Praveen Nikam Will Take Charge As Administrator )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ठिकाणी जाऊन शिवसेना (उ.बा.ठा.) आणि काँग्रेस नेत्यांकडून शहीद शेतकऱ्यांना वंदन । Photo
– उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा टाटा पॉवर सोबत करार; मावळ तालुक्यात ‘इथे’ होणार प्रकल्प
– Breaking! ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन । Hari Narke Passed Away