मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, वडगाव नगरीचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थान च्या वतीने महाशिवरात्री निमित्त, महादेव मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मागील 100 वर्षांची परंपरा जपत सांगवी गावी इंद्रायणी नदी काठी असणारे जाखमाता देवी मंदिर या ठिकाणी वडगावकर ग्रामस्थ, भजनी मंडळ, श्री पोटोबा महाराजांची पालखी घेऊन गेले. तिथे भाऊ – बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
सांगवी ग्रामस्थ त्यावेळी स्वागतासाठी सज्ज होते. पालखी पोहचल्यानंतर इंद्रायणी स्नान होऊन, भाऊ-बहिण भेटीचा सोहळा संपन्न झाला. नंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आरती होऊन चहा पान आणि उपवासाचे फलहार होऊन पालखी पुन्हा वडगाव च्या दिशेने परतीचा प्रवासाला मार्गस्थ झाली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त उपाध्यक्ष गणेश ढोरे, सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे आदी विश्वस्तांसह आरती भजनी मंडळ उपस्थित होते. ( Vadgaon Potoba Maharaj and Sangvi Jakhmata To Meet Mahashivratri 2024 )
प्रमुख विनेकरी, बबनराव भिलारे, पंढरीनाथ भिलारे, मधुकर पानसरे, सोपान मधुकर म्हाळसकर, विठ्ठलराव ढोरे, ज्ञानेश्वर म्हाळसकर, देवराम कुडे, रघुनाथ टकले, रविंद्र तुमकर, महादू खांदवे, कैलास खांदवे, बारकू खांदवे, रविंद्र म्हाळसकर, चंद्रशेखर म्हाळसकर, सोपान आगळमे, दत्तात्रय तारू, पुजारी मयूर गुरव, संतोष गुरव आदिसह महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कामशेत आणि वडगाव येथील 2 ऑर्केस्ट्रा बारवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई! बार मालकांवर गुन्हे दाखल
– मावळात विकास कामांचा धडाका सुरुच; खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते पवनमावळात 13 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
– मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka