वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आज (दि. 2 एप्रिल) रोजी लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यात पुणे लोकसभेतील उमेदवाराचे देखील नाव जाहीर करण्यात आले. पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितने मनसे पक्षाला नुकतीच सोडचिट्टी दिलेल्या वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यापासून वसंत मोरे लोकसभेच्या तिकीटासाठी प्रयत्न करत होते. अखेर वसंत मोरे यांना वंचितकडून पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पुण्यात रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसची अर्थात महाविकासआघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून वंसत मोरे हे वंचितच्या तिकीटावर पुणे लोकसभा लढवणार का, याची चर्चा रंगली होती. या चर्चेवर रवींद्र धंगेकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला तरी त्यांचं स्वागत असेल, असे धंगेकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर अखेर आज वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्याची अधिकृत उमेदवारी मिळालीये.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. pic.twitter.com/a1Gx2b9nKg
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 2, 2024
माझ्या पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व जात-धर्मीय ‘वंचित बहुजनांसाठी’ मी मैदानात येतोय..!
बदल घडणार…वसंत फुलणार…!#पुणे_की_पसंत_मोरे_वसंत pic.twitter.com/mhd0XmAvE1
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 2, 2024
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha
– वडगाव येथील पक्ष कार्यालयात मावळ भाजपाची मासिक बैठक संपन्न । Vadgaon Maval
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त