व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला प्रारंभ केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 1, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल
shrirang-barne-appasaheb-dharmadhikari

Photo Courtesy : X / MP Shriranf Barne


Maval Lok Sabha 2024 : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 1 एप्रिल) ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराला प्रारंभ केला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महायुतीकडून मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत जाऊन आजी, माजी आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. दरम्यान, सोमवारी (दि. 1) खासदार श्रीरंग बारणे यांनी अलिबागमधील रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार आणि महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘डॉ. आप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांच्या भोवती सकारात्मक ऊर्जा आहे. या ऊर्जेची अनुभूती आजच्या भेटीत झाल्याचे’ खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ( Maval Lok Sabha MP Shrirang Barne Met Maharashtra Bhushan Dr Appasaheb Dharmadhikari )

दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना वाहिली श्रद्धांजली –
माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे मागील आठवड्यात निधन झाले. अलिबाग मतदारसंघातून त्या सन 1995, 1999 आणि 2009 अशा तीन वेळेला विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्या काही काळ राज्यमंत्री देखील राहिल्या. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, कार्यतत्पर, लोकाभिमुख नेतृत्व हरपले. खासदार श्रीरंग बारणे यांनी मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, आस्वाद उर्फ पपूशेठ पाटील आणि पाटील परिवाराचे खासदार बारणे यांनी सांत्वन केले.

अधिक वाचा –
– नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट । LPG Gas Cylinder Price
– ‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024
– ‘थकीत कर भरा… नाहीतर चौकाचौकात फलकांवर नावे लावू’, थकीत कर वसूलीसाठी तळेगाव नगरपरिषद प्रशासन आक्रमक । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथील पक्ष कार्यालयात मावळ भाजपाची मासिक बैठक संपन्न । Vadgaon Maval

Next Post

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
violation-complaints-code-of-conduct

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.