व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 278 तक्रारींवर कार्यवाही

‘सी-व्हिजील’ हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 2, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
violation-complaints-code-of-conduct

Photo Courtesy : Team Dainik Maval


स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे वैशिष्ट्य असून भारत निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन उपयोजके (ॲप) विकसित करत नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यावर भर दिला आहे. त्यापैकीच एक असलेले ‘सी-व्हिजील’ हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढविण्यास उपयुक्त ठरत आहे. सी-व्हिजील ॲपवर जिल्ह्यात एकूण २७८ तक्रारी दाखल झाल्या असून सर्व तक्रारींवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी जागरुक मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे नेहमीच म्हटले जाते. त्यासाठी नागरिकांचा सहभाग मतदानापुरताच मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियवेर लक्ष ठेवण्याचा असावा असा प्रयत्न भारत निवडणूक आयोगाचा आहे. त्यादृष्टीने आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी ‘सी-व्हिजील’ ॲप उपलब्ध करुन दिले आहे. हे ॲप म्हणजे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेले अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. ( Facility of C Vigil app to report code of conduct violations Lok Sabha Election 2024 )

कशी कराल ‘सी- व्हिजील’ वर तक्रार:
मतासाठी रोख रक्कमेची लाच देणे, मोफत वस्तू वाटणे, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनीवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरुपाच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या ॲपवर साईन इन करुन करता येतात. याशिवाय नागरिक आपली ओळख जाहीर न करताही तक्रार दाखल करु शकतात.

  • आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्रे, व्हिडीओ, ध्वनीफीती (ऑडिओ) अपलोड करावे. आपण ज्या ठिकाणी ही छायाचित्रे, व्हिडीओ घेऊन अपलोड केली ते ठिकाण जीपीएसद्वारे आपोआप जिओ टॅग होते. तसेच आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाचा अधिक तपशिल भरण्याची सुविधादेखील यात आहे. यानंतर आचारसंहिता भंगाचे स्वरुप ड्रॉपडाऊन यादीतून निवडल्यानंतर संबंधित घटनेचे थोडक्यात वर्णन नमूद करणे आवश्यक असून तक्रार दाखल (सबमिट) करावी.

सी-व्हिजील ॲप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थीर संनियंत्रण पथकाशी जोडलेले असते. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीने कार्यवाही करते. भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी १५ मिनीटाच्या आत पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार दाखल केल्यानंतर १०० मिनीटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करुन त्याची माहिती तक्रारकर्त्याला पोहोचवली जाते.

तक्रारकर्त्याची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होते हेदेखील या ॲपचे वैशिष्ट्य आहे. नागरिकांनी आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळल्यास सी-व्हिजीलवर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून मावळात 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त
– नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट । LPG Gas Cylinder Price
– ‘खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल’ । Maval Lok Sabha 2024


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांनी रेवदंडा येथे घेतली महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट । Maval Lok Sabha

Next Post

मोठी बातमी! पुढील दोन दिवसात मुंबई-पुणे प्रवास करणार असाल, तर ‘ही’ बातमी नक्की वाचा । Mumbai Pune Expressway News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
block-on-mumbai-pune-express-way

मोठी बातमी! पुढील दोन दिवसात मुंबई-पुणे प्रवास करणार असाल, तर 'ही' बातमी नक्की वाचा । Mumbai Pune Expressway News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.