आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान फंडातून होणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन वडगाव मावळ शहरात करण्यात आले. या विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपुजन करण्यात आले. प्रत्यक्षात रस्ता क्रॉंक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आल्याने खूप वर्षांपूर्वीचा प्रलंबित असलेला रस्त्याचा विषय मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष आभार व्यक्त केले.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 येथील संस्कृती सहकारी गृहनिर्माण सोसायटी ते न्यू इंग्लिश स्कूल भोसले नगर येथील रस्त्यासाठी सुमारे 28 लक्ष रुपयांच्या रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या विकासकामाचा भूमिपूजन शुभारंभ नगराध्यक्ष मयुर ढोरे, नगरसेवक खंडु भिलारे, चंदुकाका ढोरे, श्रीराम ढोरे, सोसायटी अध्यक्ष निलेश वाघचौरे, उपाध्यक्ष माणिक भोसले, सचिव दिपक सुंबरे, सोमनाथ भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे प्रगतीपथावर असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी प्रभागामधील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ ढोरे, काशीनाथ ढोरे, विठ्ठल थोपटे, वनराज ढोरे, शिरीष ढोरे, संदिप ढोरे, सुनिल म्हाळसकर, रोहित ढोरे आणि स्थानिक रहिवाशी तसेच संस्कृती सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘मुलीला नोकरी आणि सरकारी योजनेतून 1 कोटी मिळवून देतो’ असे सांगत महिलेची लाखोंची फसवणूक; तळेगावातील धक्कादायक प्रकार
– पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर! लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक
– कामशेत शहराजवळील प्रभू धाब्याजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ । Maval Crime News