कामशेत शहराच्या हद्दीत सोमवारी, दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी बाराच्या सुमारास प्रभू धाब्याजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सदर महिलेचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष असून अंगात रंगबिरंगी साडी आहे, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली. याबाबत कामशेत पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद सीआरपीसी कलम 174 प्रमाणे करण्यात आली आहे. सदर अनोळखी मृत महिलेच्या वारसाचा, नातेवाईकाचा शोध सुरु असून याबाबत कुणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय शुभम चव्हाण हे करीत आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
( Excitement after body of an unknown woman was found near Prabhu Dhaba at Kamshet Maval )
अधिक वाचा –
– रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगावात नागरिकांसाठी ‘ओपन जीम’ची उभारणी; आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण
– घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा
– ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…