श्री अमरदेवी मातेच्या भक्तांसाठी सर्व सोयी-सुविधांसह नवीन धर्मशाळा बांधण्यात येणार आहे. आज मंगळवार, दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी विजयादशमीच्या मुहुर्तावर आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते या धर्मशाळेच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शेळके यांच्या समवेत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेली श्री अमरदेवी माता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी विविध उत्सवानिमित्त असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गरज ओळखून ट्रस्टने धर्मशाळा बांधण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देवस्थान विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन,” असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी दिला.
अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी
– चित्रपटातील कथा वाटावी अशी घटना; दाभाडे बंधूंच्या प्रसंगावधनामुळे ‘तो’ मुलगा सुखरूप घरी पोहोचला!!