भारतात सतत कोणत्या न् कोणत्या निवडणुका सुरुच असतात. या निवडणुकांमधील गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जाते. निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाते. निवडणूक आयोगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी अचारसंहिता आणि नियमावली तयार केली आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्याचे कामही होत आहे. लोकसभेपासून ग्रामपंचायत निवडणूकपर्यंत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. पूर्वी निवडणुकीमध्ये करावयाची खर्चाची मर्यादा सर्व ग्रामपंचायतीसाठी सरसकट पंचवीस हजार रुपये एवढी होती. त्यात सुधारणा करून ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्येवर ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हीच बाब सरपंच पदाबाबतही आहे.
सदस्य पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्येनिहाय खर्चाची मर्यादा;
- सदस्य संख्या 7 ते 9 : 25,000 रुपये
- सदस्य संख्या 11 ते 13 : 35,000 रुपये
- सदस्य संख्या 15 ते 17 : 50,000 रुपये
सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत सदस्य संख्येनिहाय खर्चाची मर्यादा;
- सदस्य संख्या 7 ते 9 : 50,000 रुपये
- सदस्य संख्या 11 ते 13 : 1,00,000 रुपये
- सदस्य संख्या 15 ते 17 : 1,75,000 रुपये
ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा आहे. तसेच हा निवडणूक खर्चाचा हिशोब निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. तसेच दररोज याची माहित विहित नमुन्यात देणे आवश्यक असते. तसेच खर्चाच्या हिशोबासाठी स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक असते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामपंचायत सदस्य संख्या आणि वार्ड संख्या;
- 600 ते 1500 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 7 तर वार्ड 3 असतात
- 1501 ते 3000 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 9 तर वार्ड 3 असतात
- 3001 ते 4500 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 11 तर वार्ड 4 असतात
- 4501 ते 6000 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 13 तर वार्ड 5 असतात
- 6001 ते 4500 गावच्या लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 15 तर वार्ड 5 असतात
- 7501 पेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रामपंचायत सदस्य 17 तर वार्ड 6 असतात
अधिक वाचा –
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी
– चित्रपटातील कथा वाटावी अशी घटना; दाभाडे बंधूंच्या प्रसंगावधनामुळे ‘तो’ मुलगा सुखरूप घरी पोहोचला!!
– वडगाव शहर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार; पीएमपी बस केंद्रात ऑनलाईन पास सेवेचा शुभारंभ