हिंदू संस्कृतीतील शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘ओपन जिमचा’ लोकार्पण सोहळा आज (दि. 24 ऑक्टोबर 2023) संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ह्या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. ( Open Gym for citizens in Talegaon Dabhade town through Rotary Club )
यावेळी आमदार शेळके यांच्या समवेत उद्योजक यादवेंद्र खळदे, दिपकभाई शहा, दिपक गंगोळी, अशोक काळोखे, रोटरीच्या प्रांतपाल शीतल शहा, अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले, सचिव शैलेश मेंथे, प्रकल्प प्रमुख मंगेश गारोळे आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम किती आवश्यक आहे, याचे महत्त्व कोरोना काळानंतर सर्वांनाच कळाले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण यांच्या आरोग्याचा विचार करुन रोटरीने ही जिम उभारली आहे. ओपन जिम ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. खुल्या वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद नागरिक यातून नक्की घेतील,’ असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.
अधिक वाचा –
– अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी