व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आंदर मावळातील पारिठेवाडी गावातील शिवकालीन महादेवी देवस्थान; पर्यटकांनाही पडतेय भुरळ

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील पारिठेवाडी या गावात वसलेली महादेवी देवस्थान हे पुण्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली महादेवी नावाने प्रसिद्ध असलेली पार्वती मातेचे एक स्वरूप आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 25, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
mahadevi-temple-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील पारिठेवाडी या गावात वसलेली महादेवी देवस्थान हे पुण्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेली महादेवी नावाने प्रसिद्ध असलेली पार्वती मातेचे एक स्वरूप आहे. शासकीय नवरात्रौत्सवाला इथे 9 दिवस अहोरात्र देवींची पूजा-अर्चा केली जाते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवस्थान मानले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या पर्वताच्या कुशीमध्ये वसलेले हे मंदिर आहे. मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारे हे महादेवी देवीचे मंदिर आहे. या मंदिरातील देवीची मूर्तीही तितकीच आकर्षक आहे. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नवरात्रीत या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होते. ( mahadevi temple in parithewadi village of andar maval area which is close to nature )

या देवस्थानाची सर्व व्यवस्था महादेवी मंदिर ट्रस्ट पाहते. माजी सरपंच संदिपशेठ टकले यांनी दुर्लक्षित पर्यटन आणि धार्मिक स्थळाच्या विकासाला चालना मिळाली होती. त्यावेळी मंदिरात आणि मंदिर परिसरात विजेची सेवा, भाविकांसाठी पिण्याचे मुबलक पाणी, परिसराचे सुशोभीकरण, मेन रस्त्यापासून ते मंदिरापर्यंत पक्का आणि मजबूत डांबरी रस्ता अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मंदिरात पहाटे 5 वाजता नियमित पूजा आणि आरती अभिषेक करण्यात येतो. तसेच पौर्णिमा आणि आमावस्येच्या आदल्या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्नान करून अभिषेक घातला जातो. नवरात्रोत्सवाच्या काळात याठिकाणी मोठा उत्सव आणि जत्रेचे देखील आयोजन करण्यात येते.

भाविकांच्या नवसाला पावणारी महादेवी देवी निसर्गाच्या सानिध्यात असलेले पारिठेवाडी गावचे ग्रामदैवत आहे. तसेच हे मंदिर गावातील पिढीजात मंदिर असून हे एक जागृत मंदिर आहे. हे मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान बनत चालले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून अस्तित्वात असणाऱ्या या पुरातन महादेवी मातेच्या मंदिराची ख्याती आहे. नवरात्रोत्सव, दसरा, यात्रोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मंदिरात रेलचेल असते.

महादेवी माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराला महाराष्ट्र शासनातर्फे पर्यटन क्षेत्र व तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, आशी मागणी स्थानिक गावकरी व माजी सरपंच संदीपशेठ टकले यांनी केली आहे. तसेच यांच्या पुढाकाराने मंदिराचा कायापालट झाला असून त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

महादेवी मंदिर परिसर हा एक दिवसाच्या सहलीसाठी एक उत्तम परिसर आहे. सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाण्याचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योगा साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. पर्यटनासाठी हा एक निसर्गाच्या सानिध्यातील रमणीय परिसर आहे. तसेच संदीप टाकले यांनी असेही सांगितले की, भविष्यामध्ये भारतातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्याचे काम करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ मोठा पुतळाही उभारण्याचं काम ते लवकरात लवकर हाती घेणार आहेत.

अधिक वाचा –
– घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा
– ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येतो? जाणून घ्या सविस्तर…
– अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’, सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन

Next Post

कामशेत शहराजवळील प्रभू धाब्याजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ । Maval Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Unknown-Dead-Body

कामशेत शहराजवळील प्रभू धाब्याजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ । Maval Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.