Dainik Maval News : संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांची ७०८ वी पुण्यतिथी श्रीक्षेत्र देहू मध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. संत श्री गोरोबाकाका धर्म शाळेमध्ये सकाळी मूर्तीस अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर सद्गुरू भजनी मंडळाचे सुश्राव्य असे भजन संपन्न झाले, दहा ते बारा या वेळेत ह.भ.प. संतोष महाराज काळोखे, अध्यक्ष सकाळ संत विचार समिती महाराष्ट्र राज्य यांची कीर्तनरुपी सेवा संपन्न झाली.
पुष्पवृष्टी व आरती संपन्न होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी संत तुकाराम संस्थांचे माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त वैभव महाराज मोरे, सुनील महाराज मोरे ,देहूच्या नगराध्यक्षा पूजाताई दिवटे ,माजी सरपंच अशोक आप्पा मोरे, चेअरमन गुलाब शेठ काळोखे, ज्येष्ठ लेखक दादाभाऊ गावडे, मुकुंद महाराज मोरे, पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे संतोष कुंभार,कुंभार समाज विकास संस्थेचे अध्यक्ष सतीशदादा दरेकर ,समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष बाबाजी कुंभार उपस्थित होते.
तसेच भगवानराव कुंभार ,युवक अध्यक्ष स्वप्निल कुंभार , रवींद्र कुंभार ,दत्तात्रय भसे सर, एपीआय कारके साहेब तानाजी दरेकर, रामचंद्र हाडशीकर, बाळासाहेब कुंभार,मावळ तालुका अध्यक्ष जयवंत कुंभार,पांडुरंग दरेकर, सुधीर कुंभार, मनोहर भालेराव, अनिकेत कुंभार, संत गोरोबाकाका धर्मशाळेचे व्यवस्थापक ह भ प लिपने महाराज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास देहूतील ग्रामस्थ व कुंभार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे सचिव प्राध्यापक विकास कंद यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संत शिरोमणी गोरोबाकाका सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime