व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime

लॅपटॉप आणि संगणक चोरणाऱ्या परप्रांतीय कामगारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तमिळनाडू राज्यात जाऊन अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 26, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : गोळेवाडी (ता. मावळ) येथील एका खासगी कंपनीतून लॅपटॉप आणि संगणक चोरणाऱ्या परप्रांतीय कामगारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तमिळनाडू राज्यात जाऊन अटक केली आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकास परत देण्यात आला आहे.

फॅब्रीकेशन व्यावसायिक अर्जुन रामबाबू महतो (रा. एस. एम. हाईटस, इंद्रापुरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी १५ एप्रिल रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संगणक चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती.

फिर्यादी यांची गोळेवाडी गावच्या हद्दीतील ए. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी असून तिथे काम करणारा मूळचा तमिळनाडूचा कामगार आरोपी एस. प्रसाद (वय ३०, एक्झरबिया सोसायटी, आंबी, ता. मावळ) याने कंपनी मालक आणि इतर कामगारांच्या ऑफिसमधील दोन लॅपटॉप आणि एक डेस्कटॉप अशा एकूण ८५ हजार रुपयांच्या मालाची चोरी करून पळून गेला होता.

मालाच्या किमतीपेक्षा संगणकातील डाटा कंपनीच्या दृष्टीने महत्वाचा होता. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांच्या सूचनेप्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनंत रावण, पोलीस नाईक डी. के. सातकर आणि व्ही. बी. शेरमाळे आदींचे पथक तमिळनाडूमध्ये गेले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री एस. प्रसाद याला ताब्यात घेतले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


Previous Post

आंचल मोरे हिची 63 व्या नॅशनल फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड ; मावळ तालुक्यातील पहिलीच मुलगी । Maval News

Next Post

पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Eknath Shinde provides Rs 5 lakh assistance to family of Kashmiri youth who lost his life while rescuing tourists

पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.