राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका चे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या वडीलांचे आज (दि. 7) सकाळी दुःखद निधन झाले. गणेश खांडगे यांचे वडील कै. वसंतराव खांडगे यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. (Vasantrao Khandge Passed Away) ते 89 वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. परंतू आज सकाळी 7.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बनेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वसंतराव खांडगे हे मावळ तालुक्याच्या समाजकारणात आणि राजकारणात सहभागी होते. मावळ तालुक्यातील तळेगाव नगरीतील एक प्रसिद्ध व्यवसायिक आणि राजकीय व्यक्ती असा त्यांचा लौकीक होता. तसेच नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले. यासह तळेगाव नगरपरिषदेचे ते माजी नगरसेवक होते आणि जुन्या काँग्रेसचे निष्ठावान प्रतिनिधी होते. तळेगाव स्टेशन परिसरातील विकासकामांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. (Vasantrao Khandge father of NCP Maval taluka president Ganesh Khandge passed away)
अत्यंत प्रामाणिक, शांत, संयमी, मितभाषी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून वसंतराव दादा खांडेगे सुपरिचित होते. सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले. तसेच ते उत्कृष्ट मृदुंग वादक आणि भजनकरी देखील होते. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सूना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक गणेश खांडगे यांचे ते वडील तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे आणि उद्योजक स्वानंद खांडगे यांचे ते चुलते होत. त्यांच्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? साहेबांचा की दादांचा? निवडणूक आयोगाने दिला अंतिम निकाल, लगेच वाचा । EC Settles Dispute In NCP
– मावळ तालुक्यासह पिंपरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश! ‘या’ नेत्यांच्या हाती खासदार बारणेंनी बांधले शिवबंधन
– महत्वाचे! पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात, जमीन मालकांना आतापर्यंत 2 हजार 625 कोटींचा मोबदला वाटप । Pune Ring Road News