मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) तळेगाव ( Talegaon ) जवळ होणारा वेदांता फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn ) प्रकल्प गुजरात राज्यात हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतला. ही माहिती समोर येताच मावळ तालुक्यातील आणि तालुक्यासह राज्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच, हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस ( Eknath Shinde and Devendra Fadanvis ) सरकारवर जोरदार टीका होत आहे. याच मुद्द्यावर बेरोजगार तरुण-तरुणी, विविध कामगार संघटना यांच्यासोबत शिवसेना ( Shiv Sena ) , युवासेना ( Yuva Sena ) यांनी आवाज उठवला असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या नेतृत्वात शनिवारी (24 सप्टेंबर) वडगाव ( Vadgaon ) शहरात भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अतिशय भव्य स्वरुपात झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक इतर पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य जनता सामील झाली होती. यावेळी मोर्चाचे पुढे भव्य अशा सभेत रुपांत झाले, या भव्य सभेत आदित्य ठाकरे यांनी खणखणीत भाषण करत वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn Project ) राज्याबाहेर गेल्याबद्दल राज्यातील शिंदे सरकारला धारेवर धरले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जनआक्रोश रॅलीतील आदित्य ठाकरे यांचे संपूर्ण भाषण, वाचा….
महाराष्ट्रातून एक एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प मावळमधून गेला त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. जर आज आपलं महाविकास आघाडीचे सरकार असतं तर हा प्रकल्प आपण पुन्हा महाराष्ट्रात आणला असता म्हणजे आणलाच असता.
“हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे तरुणांमध्ये आक्रोश आहे. जेव्हा हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला तेव्हा मला याचे दुःख नव्हते की तो गुजरात किंवा दुसऱ्यया राज्यात गेला. महाराष्ट्राने आजवर स्वतःच्या जोरावर अनेक उद्योग राज्यात खेचून आणलेत. पण दुःख या गोष्टीचे आहे, जो प्रकल्प शंभर टक्के ठरलं होतं की महाराष्ट्रात येणार, जो प्रकल्प शंभर टक्के तळेगावात येणार होता, हे ठरलं होतं मग हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? याचं दुःख वाटत” असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
हेही वाचा – व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांनी आज वडगाव मावळ येथे झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण तरुणींना आवाहन केले की, 'हे खोके सरकार जिथे कुठे येईल तिथे त्यांना, माझ्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात का पाठवला, याचा जाब विचारा.' pic.twitter.com/yF5VNwKmUR
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 24, 2022
“दाओस येथील बैठकीत आम्ही 80 हजार कोटींची गुंतवणूक राज्यासाठी आणली होती. वेदांता प्रकल्प देखील शंभर टक्के राज्यात आणि त्यातही तळेगावात होणार होता. गुजरातपेक्षा आपण त्या कंपनीला 10 हजार कोटीपेक्षा जास्त सबसिडी देणार होतो. 1200 एकर जमीन आपल्या इथे तळेगावात देणार होतो. पण आता प्रकल्प जिथे गेलाय तिथे पाण्याचे दुर्भीक्ष असल्याचे” आदित्य ठाकरेंनी सांगितले.
“परंतू राज्यात खोके सरकार आलं आणि या प्रकल्पावर डोळे ठेवून असलेले गुजरात तो प्रकल्प तिकडे घेऊन गेलं. त्यामुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेला याचा दोष गुजरातचा नाही तर नाकर्ते खोके सरकारचा आहे,” असाही घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.
“मुख्यमंत्र्यांनी 25 की 26 जुलैला सांगितलं होतं, विधानसभेत सांगितलं होतं की वेदांता येणार आहे. 4 लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे, पण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – मावळ तालुक्यात होणारा प्रकल्प गुजरातला गेला; राज ठाकरे भडकले, म्हणाले ‘उलटा प्रवास सुरु’
आमचा रोजगार, आमचा हक्क | जनआक्रोश आंदोलन | जिल्हा पुणे – LIVE#AadityaThackeray #ShivSena #जनआक्रोश #पुणे https://t.co/TTHyG6XHUp
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 24, 2022
तुम्ही खोके घेऊन ओके, पण आमचं काय?
“हे सर्व जण पन्नास वर्षापूर्वीचे प्रश्न घेतायेत, त्यावर बोलतायेत. जागतिक प्रश्न घेऊन बोलतायेत. पण शिवसेनेने महाराष्ट्राचा प्रश्न घेतला. रोजगाराचा प्रश्न शिवसेनेने घेतले. राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेने सोबतच होते. आणि त्यामुळे आम्ही विचारतोय, तुम्ही तर पन्नास खोके घेऊन ओके झाला पण आमचं काय? आणि हा प्रश्न आम्हीच नाही सर्व तरुण तरुणी विचारतायेत. आमच्या तर पाठीत खंजीर खुपसला पण या बेरोजगार तरुणांना पण फसवलं,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
तरुणांच्या पाठीवर का वार करताय?
“राज्यातील उद्योग मंत्र्यांना वेदांता – फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेले हे माहिती नव्हतं. त्यांना विचारल्यावर म्हणाले माहिती घेऊन बोलतो. त्यांना इतर आणखीन प्रकल्प गेल्याची माहिती नाही. अशा मंत्र्यांचे काय करायचं. आमचे ठिक आहे पण राज्यातील तरुणांच्या पाठीवर का वार करताय?” असा सवाल ठाकरेंनी केला. ( Shiv Sena Yuva Sena Chief Aditya Thackeray Public Outcry Rally Vadgaon Maval Read Complete Speech )
अधिक वाचा –
मोठी बातमी! ठाकरेंनी कोर्टातली लढाई जिंकली, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी, शिंदे गटाला झटका
शिवतीर्थावर घुमणार आव्वाज ठाकरेंचा..! कोर्टाच्या निर्णयानंतर मावळमधील शिवसैनिकांचा जल्लोष, पाहा Video