वेदांता-फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn ) कंपनी संदर्भात महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील आणि मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी ( BJP ) – शिवसेना (शिंदे गट) – आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या ( Mahayuti ) वतीने सोमवारी वडगाव मावळ ( Vadgaon Maval ) येथे आंदोलन करण्यात आले. भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम ( Ram Kadam ) खासदार श्रीरंग बारणे ( MP Shrirang Barne ) माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महायुतीचे ठिय्या आंदोलन ( Thiya Andolan of BJP Alliance ) पार पडले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून वेदांता-फॉक्सकॉन कंपनी तळेगाव येथे होण्यांसंदर्भात तात्कालीन ठाकरे सरकारने कोणताही MOU केला नसल्याचे लेखी स्वरूपातील पत्र यावेळी आंदोलकांना प्राप्त झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच हे पत्र प्राप्त झाल्यानंकर, ठाकरे सरकारचा खोटा चेहरा जनतेसमोर पुन्हा एकदा उघडा झाल्याने आदित्य ठाकरे यांनी मावळच्या जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनाला राम कदम यांच्यासह मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब, मावळचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, RPI पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सूर्यकांत वाघमारे, मावळ शिवसेना प्रमुख राजेंद्र खांडभोर, आरपीआय तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्यासह मावळ तालुक्यातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Vedanta Foxconn Project Thiya Andolan By BJP Alliance Vadgaon Maval Ram Kadam Shrirang Barne Bala Bhegade Presence )
अधिक वाचा –
वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण