दिनांक 1 डिसेंबर म्हणजेच स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांची जयंती. दरवर्षीप्रमाणे यंदाही (गुरुवार, 1 डिसेंबर) रोजी दापोडीत फुगेवाडी येथे भाई कोतवाल चौकात सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांची जयंती साजरी होणार आहे. ( Veer Bhai Kotwal Birth Anniversary )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाई कोतवाल हुतात्मा झाले. भारतीय स्वातंत्र्य दिनास ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या क्रांतीकारकांना अभिवादन केले आहे. भाई कोतवाल यांची जयंती साजरी करताना आपण सर्वांनी प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यासाठी यावे ही विनंती. माझी सर्व समाज बांधवांना विनंती की सर्वांनी आपल्या मोबाईल वर भाई कोतवाल अमर रहे असा संदेश टाईप करुन स्टेट्स ठेवावे आणि भाई कोतवाल यांचा फोटो डिपी ठेवावा. ह्या निमित्ताने सकाळी प. पू. सदगुरू माऊली महाराज वाळुंजकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन होईल आणि त्यानंतर डॉ जितेंद्र वडशिंगकर सर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाई कोतवाल यांचे कार्य विषयावर मार्गदर्शन व्याख्यान होईल,” अशी माहिती अशोक नारायण मगर यांनी दिली.
अधिक वाचा –
– सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died
– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन खाते विशेष प्रयत्न करणार