Dainik Maval News : वेहरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना संदिप देवकर यांना त्यांच्या कार्यकाळात वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या विविध विकासकामांबद्दल नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामसमृध्दी पुरस्कार सोहळा 2024 दरम्यान देवकर यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी नालंदा ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अर्चना देवकर यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या विविध योजना गावात अतिशय व्यवस्थितरित्या राबवून त्यांद्वारे गावातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून दिला होता. तसेच पायाभूत सुविधा, स्वच्छता यांबाबत देखील वेहरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे नाव तालुक्यात गाजले होते. ( Vehergaon Dahivali Gram Panchayat Ex Sarpanch Archana Deokar honored By Adarsh Sarpanch Award )
अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी
– दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News
– आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा