पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) आणि मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2022-23 तालुकास्तरीय विविध स्पर्धा माळवाडी येथे संपन्न झाल्या. यात तालुकास्तरीय लोकनृत्य या अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेहेरगाव या शाळेचा मोठ्या गटात प्रथम क्रमांक आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते वेहेरगाव शाळेला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील सहभागी स्पर्धक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीही शुभेच्छा देण्यात आले.
वेहेरगाव शाळेच्या स्पर्धक विद्यार्थ्यांना केंद्रस्तर आणि बीटस्तर लोकनृत्य स्पर्धेला घेऊन जाण्यासाठी अशोक कुटे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. तालुकास्तरीय स्पर्धेला जाण्यासाठी वेहेरगावच्या विद्यमान उपसरपंच काजल मोरेश्वर पडवळ यांच्या सौजन्याने बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगाव (दहिवली) आणि शाळा व्यवस्थापन समिती वेहेरगाव यांचेही सहकार्य लाभले. ( Vehergaon Zilla Parishad Primary School Won First Prize In Maval Taluka Level Folk Dance Competition )
अधिक वाचा –
‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग
आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त 43 शाळांना वॉटर प्युरिफायर भेट, तर 400 महिलांना साडी आणि मिठाई वाटप