Dainik Maval News : पवन मावळातील तीस ते चाळीस गावांसाठी महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या कामशेत शहराला जोडणाऱ्या कामशेत – पवनानगर मार्गावरील खड्डे ही समस्या कायम असताना, याच मार्गावरील प्रमुख व एकमेव घाट असेल्या बौर घाटात दरड कोसळण्याच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी दरडीचा काही भाग, दगड – गोटे खाली आले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटातून दररोज शेकडो शेतकरी, दुग्धव्यवसायिक, हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. अतिपावसाचा हा प्रदेश असून अनेक वर्षांपासून घाट परिसरात हवी तशी डागडुजी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाटात रस्त्याची, साईडपट्ट्यांची दुर्दशा झालेली दिसते. अशात या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
केदारेश्वर मंदिराजवळील दरड धोकादायक अवस्थेत :
मार्गावरील श्री केदारेश्वर मंदिराजवळील डोंगरकड्यांवरून संततधार पावसामुळे दरड कोसळण्याचा आणि दगड-झाडे रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दगड रस्त्यावर पडले आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही अपघाताचा धोका मात्र कायम आहे. रस्त्याच्या दोन्ही कडांचे भाग ढिसूळ झाले असून कधीही मोठा अपघात घडू शकतो.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच या ठिकाणी घाट परिसरात अन्यत्र असतात त्याप्रमाणे सुरक्षेच्या उपाययोजनांची, जाळी लावण्याची मागणी होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया