Dainik Maval News : अनेक महिने प्रभारी मुख्याधिकारी पाहिलेल्या तळेगाव दाभाडे शहराला गुरुवारपासूव पूर्णवेळ आणि पूर्वीचेच मुख्याधिकारी मिळाले आहेत. विजयकुमार सरनाईक यांनी गुरुवार (दि. 19) तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे रोजी स्विकारली. यावेळी नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे यवतमाळ येथून बदली होऊन पुन्हा तळेगावमध्ये आले आहेत. यापूर्वी सरनाईक यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर दिनांक 26 एप्रिल 2022 ते 24 एप्रिल 2023 पर्यंत तसेच दुसऱ्यांना 4 डिसेंबर 2023 रोजी कारभार स्विकारला होता. त्यानंतर आता तिसऱ्यांदा गुरुवारी (दि. 19) तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदावर विराजमान झाले आहेत. ( Vijayakumar Sarnaik accepted charge of post of CEO of Talegaon Dabhade Nagar Parishad )
यापूर्वीचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यावर मध्यंतरी राज्य शासनाने ड्रंक अंड ड्राईव्ह प्रकरणात निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी म्हणून लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साबळे यांनी, तसेच वडगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी कामकाज पाहिले. यानंतर आता विजयकुमार सरनाईक तिसऱ्यांना तळेगावचे मुख्याधिकारी म्हणून पदावर आले आहेत.
अधिक वाचा –
– केंद्राच्या ‘एक देश – एक निवडणूक’ निर्णयाचे स्वागत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– Maval Vidhan Sabha : सुनिल आण्णांनी कसलीये कंबर.. रवी आप्पा अन् बापू साहेबांनी बी लावलाय नंबर.. कोण असणार महायुतीचा मेंबर?
– रविंद्र भेगडे यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित । Maval News