Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी पुन्हा एकदा विजयकुमार सरनाईक यांची नियुक्त झाली आहे. पूर्वीचे अधिकारी एन के पाटील यांचे निलंबन झाल्यामुळे नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त होते. या पदाचा तात्पुरता पदभार वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्याकडे होता. परंतु आता पुन्हा एकदा तळेगावच्या मुख्याधिकारी पदी विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले विजयकुमार सरनाईक यांची जेव्हा बदली झाली तेव्हाच नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर आमदार सुनील शेळके यांनी देखील पुन्हा एकदा सरनाईक यांची नियुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अखेर सोमवारी सरनाईक यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदास्थापना होत असल्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले.
अधिक वाचा –
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News
– शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News
– मोठी बातमी ! इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road News