विकसित भारत संकल्प यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून 826 ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात 4 लाख 7 हजार 619 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभदेखील देण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणी देखील करून घेण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून ‘हर घर जल’ च्या 409 जोडण्या, 34 ओडीएफ शौचालय, 390 मृदा आरोग्य कार्ड, 468 उज्वला गॅस, 3 हजार 732 सुरक्षा विमा योजना, 3 हजार 23 नागरिकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला. ( Viksit Bharat Sankalp Yatra In Pune District )
आरोग्य शिबिराअंतर्गत 85 हजार 907 नागरिकांची तपासणी, 35 हजार 611 क्षय रोग तपासणी, 28 हजार 346 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 26 हजार 624 खेळाडू, 53 हजार 606 विद्यार्थी, 26 हजार 736 स्थानिक कलाकार आणि 99 हजार 144 महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 3 हजार 880 ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
यात्रेद्वारे 512 शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. 260 लाभार्थ्यांना शौचालय प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी 1 लाख 97 हजार 785 नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला. विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सूरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अधिक वाचा –
– दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade
– कौतुकास्पद! मावळच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड । Chaitanya Kondbhar
– पुन्हा होणार विठू नामाचा जागर! कामशेत इथे 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव, ‘हे’ प्रसिद्ध कीर्तनकार करणार कीर्तनसेवा । Maval Kirtan Festival