Dainik Maval News : पहिल्याच पावसात वडगाव शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. यात श्री पोटोबा मंदिराजवळील श्री महादेव मंदिरात जवळील ओढ्याचे पाणी शिरले. यातून महादेवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. प्रशासनाने योग्यप्रकारे पावसाळापूर्वीची कामे न केल्याने ही परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप करीत वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थांनी श्री महादेवास दुग्धाभिषेक घालून आंदोलन केले.
पहिल्याच पावसात वडगाव नगरपंचायत कडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांची चांगलीच पोलखोल झाली. मान्सून दाखल होण्यापूर्वी करण्यात येणारी नाले- ओढ्यांची सफाईची कामे ही वडगाव नगरपंचायत प्रशासनाने वेळेत पूर्ण न केल्यामुळे मुसळधार पावसाने वडगाव मुख्य बाजारपेठेत काहीशी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
शहराच्या मधोमधुन वाहणाऱ्या देव ओढ्याला पावसाच्या पाण्याने अगदी नदीचे स्वरूप आल्याचे दृश्य तयार झाले होते, ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याची नालेसफाई न झाल्याने पाण्याच्या मार्गामध्ये मोठा कचरा साठून दूषित पाणी व माती रस्त्यावरून ओसंडून वाहात बाजूला असणाऱ्या महादेव मंदिरात शिरल्याने मंदिर व पिंड पुर्णतः प्रदुषित व अपवित्र झाली. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
नगरपंचायत प्रशासनाने याची कोणतीही दखल गांभीर्याने न घेतल्याने माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने शंभू महादेव पिंडीला विधीवत दुग्धाभिषेक घालून पिंड व मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेला जबाबदार असणाऱ्या वडगाव नगरपंचायतच्या विरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर, पोटोबा देवस्थान विश्वस्त अनंता कुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) युवक तालुका अध्यक्ष विशाल वहिले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, सुनील शिंदे, मनसे नेते तानाजी तोडकर, मनसे वडगाव शहराध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, संतोष म्हाळसकर, शिवसेना नेते बाळासाहेब शिंदे,नितीन चव्हाण, आशिष म्हाळसकर,महेंद्र शिंदे, करण शिंदे,आदित्य म्हाळसकर प्रणव म्हाळसकर,विकास साबळे,आकाश वारिंगे, रोहित कोळी,विजय पाटील, अजिंक्य शिंदे, सुरेश धनवडे, रेणुका म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर,मंदा म्हाळसकर,वंदना म्हाळसकर, अनुपमा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके