व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत शहर हद्दीतील टेकडीवर सापडले पुरातन शिवलिंग ; ग्रामस्थांसह शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण । Kamshet News

कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत खिंडीजवळील टेकडीवर वृक्षारोपण करीत असताना ग्रामस्थांना जमिनीत शिवपिंड दिसून आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 26, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
ancient-shivling-found-on-hill-in-kamshet-maval-limits

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत खिंडीजवळील टेकडीवर वृक्षारोपण करीत असताना ग्रामस्थांना जमिनीत शिवपिंड दिसून आली. वृक्षारोपणाचा खड्डा घेताना ही शिवपिंड सापडली, ज्या तरुणांना ही पिंडी निदर्शनास आली त्यांनी त्वरित इतिहास संशोधकांना बोलावून पिंड दाखविली. या घटनेमुळे कामशेत शहर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून शिवभक्त, ग्रामस्थ येथे दर्शनार्थ येऊ लागले आहे.

इतिहास संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, शैव सांप्रदाय हा भारताच्या इतिहासाचा महत्वपूर्ण भाग आहे. भारतभर शिवलिंग अर्थात शिवपिंडीचे पूजन करून शैवपंथाने आपले भक्तीसुख अनुभवलेले दिसून येते. प्राचीन काळापासून शैव सांप्रदाय चालत आला असून भक्तांची मोठी परंपरा या सांप्रदायास आहे. यात उप-सांप्रदाय देखील असून विरशैव, नाथ आणि लिंगायत यांचा समावेश होतो.

  • प्राचीन, मध्ययुगीन ते अर्वाचीन काळात महादेवभक्त सर्व क्षेत्रात कार्यरत असल्याचे आपल्याला सह्याद्रीमधील दुर्गांवर व परिघात असलेल्या पाण्याच्या ठिकाणावर दिसून येते. बहुतांश पाण्याच्या टाक्यावर तसेच दुर्गपरीघातील पानवठ्यावर कातळ्यास एक वित आकाराच्या पिंडी संशोधकांच्या निदर्शनास आल्या आहेत.

पवन मावळ, नाणे मावळ व आंदर मावळ असे तीन शिवकालीन मावळ मिळून आजचा मावळ तालुका बनलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रथम टप्प्यात मावळातील दुर्ग जिंकून घेतले होते. यातील प्रत्येक दुर्गावर महादेवाचे रूप असलेल्या शिवपिंडीची स्थापना महाराजांनी केली होती. आजही सर्व दुर्गांवर महादेवाची मंदिरे स्थित असून इतिहासाची साक्ष देतात.

दुर्ग सोडता मध्ययुगात अनेक मंदिरे सपाट पृष्ठभागावर देखील बांधन्यात आली. यात मावळातील वाघेश्वर मंदिर, कोंडेश्वर मंदिरासारखी अनेक मंदिरे आजही भक्तांची प्रेरक स्थाने आहेत. मात्र कालपरत्वे अनेक ठिकाणी भक्तांनी कोरून, बनवून ठेवलेल्या अनेक पिंडी मातीखाली गेल्या. इतिहास बुजला गेला. लोहगडावरील नंदी कुणी अज्ञाताने चोरून नेला किंवा खाली ढकलून दिला. अशा घटना होत असल्या तरी यातूनही नव्याने काही ठिकाणी सह्याद्रीचा इतिहास, श्रद्धा व आस्था असलेल्या पिंडी, समाधी शिलालेख समोर येत आहे हे मोठे सकारात्मक चित्र आहे.

कामशेत येथील नव्याने उजेडात आलेली शिवपिंडी एक अस्सल ऐतिहासिक मध्ययुगीन पिंडी असून कालौघात मातीखाली गेली होती. या पिंडीचा अभ्यास केल्यानंतर तिचा काळ मध्ययुग येत असल्याचे निदर्शनास आले. खडकाळा हा ऐतिहासिक भाग असून येथील खिंडीत जनमानसाचे भक्तीस्थान असलेले महादेवाचे जुने देवस्थान होते हे समोर येत आहे. – डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक

“संकल्प से सिद्धी तक” या कार्यक्रमांतर्गत कामशेत शहरात भारतीय जनता पार्टी वडगाव कामशेत आंदर मावळ मंडलच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम चालू असताना झाडे लावण्यासाठी खड्डा घेत असताना त्यात शिवलिंग दिसून आले. शिवलिंग असल्यामुळे आम्ही इतिहासकार याना याची कल्पना दिली. ही शिवलिंग मध्ययुगीन असल्याचे समजलं. – अभिमन्यू शिंदे, मंडलाध्यक्ष, भाजपा

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके


dainik maval jahirat

Previous Post

नायगाव येथील टोनी दा ढाब्यावरील हाणामारीप्रकरणी सात जणांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी । Maval Crime

Next Post

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा श्री महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांकडून निषेध । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Villagers protest against Vadgaon Nagar Panchayat by performing abhishek at Mahadev temple

वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा श्री महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून ग्रामस्थांकडून निषेध । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.