Dainik Maval News : मळवली रेल्वे स्टेशन येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्यास मळवळी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. मळवली ग्रामस्थांसह पाटण, बोरज, भाजे, देवले, सदापूर आणि इतर गावातील नागरिकांनी उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्याविरोधात एकमताने विरोध केला आहे.
यासंदर्भात मळवली ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्याच्या विरोधात ठराव मंजूर केला. तसेच उड्डाणपुल व्हावा परंतु जुन्या आराखड्यानुसार पुलाचे काम करावे, असाही ठराव मंजूर केला आहे.
- सन 2012 साली रेल्वे प्रशासनाच्या पत्रानुसार पूर्वी मंजूर केलेला उड्डाणपुल कायम करण्यात यावा, सन 2019/20 साली सर्वेनुसार केलेल्या आराखडा (नकाशा) प्रमाणे ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठरावाला मंजुरी देण्यात आली. तसेच नवीन आराखडा सर्वानुमते नामंजूर करण्यात आला.
तसेच याबाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डिव्हिजन रेल्वे मॅनेजर पुणे, जिल्हाधिकारी पुणे, तहसीलदार मावळ, डेप्युटी चिफ इंजिनियर कन्स्ट्रक्शन पुणे, गटविकास अधिकारी मावळ यांना मळवली ग्रामपंचायतीकडून पत्र देण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway